Pomegranate: अनेक आजारांसह अशक्तपणावर डाळिंबाचा रस, सालीचा काढा उपयुक्त ठरतो. त्यामुळे नियमित डाळिंब सेवन हे खऱ्या अर्थाने निरोगी जीवनास मदत करणारे ठरते.
Pomegranate:: कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह मोठ्या प्रमाणात असतात. डाळिंबाच्या दाण्यांचाच नव्हे, तर साल, पाने, फुले, बिया, मुळे या सर्वच भागांचा औषधामध्ये वापर करतात.
Pomegranate: शरीरातील विविध क्रिया सुरळीत करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. मुळात डाळिंबात अँटी ऑक्सिडंट जास्त असतात. त्यामुळे अनेक आजारांना प्रतिबंध करण्याचे कार्य डाळिंबाद्वारे होते.
Pomegranate: फळासोबत साल, बियांचा औषधी उपयोग होतो. मासिक पाळीच्या अडचणी दूर होणे, फफ्फुसाची क्षमता वाढणे, कर्करोग प्रतिबंधक क्षमता यासारख्या अनेक गुणांमुळे उपयुक्त.
Pomegranate: चिरतारुण्य टिकवण्यासाठी रोज एक डाळिंबाचे सेवन करावे. अपचन, आम्लपित्त, तापीने तोंडास दुर्गंधी डाळिंबाने जाते.
Pomegranate: शरीर मजबूत, काटक व सुंदर बनविण्यासाठी डाळिंब रस व आवळा रस एकत्र करून त्यामध्ये खडीसाखर घातलेले मिश्रण आठ दिवस उन्हात ठेवावे व रोज कप प्यावे.
Pomegranate: घसा दुखणे, तोंड येणे आजारावर डाळिंबाच्या सालीच्या काढ्याने गुळण्या कराव्यात. श्वेत व रक्त प्रदरावर डाळिंबाची साल तांदळाच्या धुवणात वाटून द्यावी
Pomegranate: डाळिंबाच्या सालीचे चूर्ण नागकेशरमध्ये घेतल्यास मूळव्याधीत रक्त पडण्याचे बंद होते. अशक्तपणावर डाळिंबाचा रस उपयुक्त. ताप आल्यास डाळिंब खावे
Pomegranate: रक्तक्षय असल्यास रोज एक डाळिंब खावे. जुलाब असल्यास डाळिंब खाणे फायदेशीर. रक्ताभिसरणासाठी डाळिंब रस उपयुक्त