माध्यमिक शाळांच्या परीक्षेचा काही विभागांचा निकाल लागला आहे. त्यामुळे महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेची तयारी सुरू झाली आहे.
पालकांची ऐनवेळी धावपळ होऊ नये, याकरिता रहिवासी दाखला ते उत्पन्नाचा दाखला असे विविध प्रमाणपत्रे काढण्यासाठी पालकांनी जागरुकता दाखवणे गरजेचे आहे.
ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, सेतू कार्यालयात निर्धारित शुल्क देऊन दाखले मिळतात. पालकांनी आवश्यक दाखले काढण्यासाठी लवकर सुरवात करणे गरजेचे आहे.
आवश्यक प्रमाणपत्रे
■ रहिवासी प्रमाणपत्र : विद्यार्थी कोणत्या राज्याचा रहिवासी आहे, हे सिद्ध करण्यासाठी या प्रमाणपत्राची मागणी होते.
■ उत्पन्नाचा दाखला : शिष्यवृत्तीसह शाळा-महाविद्यालयीन प्रवेशावेळी उत्पन्नाच्या दाखल्याची गरज असते. अनुसूचित जाती-जमाती, इतर मागास प्रवर्गासाठी दाखल्यांची गरज आहे.
■ ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र : आर्थिक दुर्बल घटकासाठी नोकरी किंवा महाविद्यालयीन प्रवेशासाठी ईडब्ल्यूएस प्रमाणपत्राची आवश्यकता असते.
■ जात प्रमाणपत्र : महाविद्यालयात राखीव जागांसाठी अर्ज करण्यासाठी अनेकदा जात प्रमाणपत्र द्यावे लागते.
■ प्रमाणपत्र : भारतीय नागरिक असल्याचा पुरावा म्हणजे राष्ट्रीयत्वाचा दाखला होय. अनेकदा महाविद्यालयीन प्रवेशाच्या वेळी या दाखल्याची मागणी होते.
■ सेतू सुविधा केंद्रावर सर्व प्रकारच्या प्रमाणपत्रांसाठी शुल्क निर्धारित करण्यात आले आहे. तसा फलकही लावला जातो.