आंबा खाण्याचे नियम माहीत आहेत का? जाणून घ्या, नाही तर पडाल आजारी
आंबा सगळ्यांनाच फार आवडतो. आंबा खाल्ल्यावर कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याकरिता काही नियम पाळणे गरजेचे असते.
आंबा व्यवस्थितपणे पिकला आहे याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. आंबट आंबा शरीरात रक्तदोष उत्पन्न करतो व पित्त वाढवतो.
आंबा पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइड वगैरेसारखे रसायन वापरले गेलेले नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.
प्रथमदर्शनी आंब्यावर हिरवे, पिवळे, काळे असे विचित्र डाग दिसत असतील तर रसायन वापरण्याची शक्यता असते. म्हणून आंबा घरी पिकवायला ठेवणे सगळ्यांत चांगले.
आंबा खाण्यापूर्वी व्यवस्थितपणे पाण्याने धुवावा व नंतर किमान दोन तास तरी पाण्यात भिजवून ठेवावा. यामुळे केमिकल्स कमी होतात, उष्णतेचा त्रास कमी होतो.
ज्यांना आंबा खाल्ल्यावर अंगदुखी, सांधेदुखी किंवा त्वचेचे त्रास होतात त्यांनी आंब्याच्या फोडी खाणे टाळणेच इष्ट, क्वचित आंब्याचा रस खाल्ला तर चालू शकते.
शक्यतो सकाळच्या वेळी आंब्याचा रस खाणे उत्तम. पचत नसल्यास संध्याकाळी आंब्याचा रस न खाणेच चांगले.