अष्टविनायक यात्रा आता एका दिवसात
अष्टविनायकाची यात्रा आता २४ तासात पूर्ण करणे शक्य होणार आहे.
ही सर्व स्थळे एकमेकांना जोडणाऱ्या २५२ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्लूडी) पूर्ण केले आहेत.
आठ मंदिरांपैकी पाच मंदिरे पुणे जिल्ह्यात (मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर आणि लेण्याद्री) आहेत.
सिद्धटेक अहमदनगर, तर महाड आणि पाली मंदिरे रायगड जिल्ह्यात आहेत.
महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी अष्टविनायक एक आहे.
अष्टविनायक दर्शन हा संपूर्ण मार्ग ६५४ किमीचा आहे.पण आता तो २५२ किमी इतका कमी झाला आहे.
अष्टविनायकाच्या सर्व मंदिरांचे मार्ग जोडले गेल्याने भाविकांचा प्रवास सोपा होणार आहे.